माझे स्पष्ट उद्दिष्टे (Goals)
🔸 सर्वांगीण प्रभाग विकास : रस्ते, पाणीपुरवठा, गटार व स्वच्छता या मूलभूत सेवांची 100% सुधारणा नागरिकांच्या दैनंदिन अडचणींवर वेळेवर आणि पारदर्शक उपाय
🔸 शिक्षण आणि कौशल्य विकास : विद्यार्थ्यांसाठी फ्री मार्गदर्शन व स्कील ट्रेनिंग , महिलांसाठी आणि युवकांसाठी रोजगाराभिमुख कोर्सेस
🔸 आरोग्य आणि सुरक्षितता : प्रत्येक वस्तीमध्ये नियमित हेल्थ चेकअप कॅम्प, महिला आणि ज्येष्ठ नागरिकांसाठी विशेष आरोग्य उपक्रम प्रभागातील सुरक्षा व्यवस्थेत सुधारणा
🔸 महिला सबलीकरण : महिलांसाठी स्वयंरोजगार प्रकल्प.,स्वरक्षण, आरोग्य आणि आर्थिक साक्षरता कार्यक्रम
🔸 युवकांसाठी संधी: करिअर मार्गदर्शन, IT-ट्रेनिंग, रोजगार माहिती खेळ आणि सांस्कृतिक उपक्रमांना प्रोत्साहन
🔸 पर्यावरण संवर्धन : वृक्षारोपण, पाणी बचत आणि प्लास्टिक मुक्ती मोहिमा, स्वच्छ आणि हिरवे नाशिक निर्माण करण्यासाठी उपक्रम
🔸 पारदर्शक आणि जबाबदार प्रभाग प्रशासन : कोणत्याही पक्षाच्या दडपणाशिवाय जनतेला केंद्रस्थानी ठेवून निर्णय नागरिकांसोबत थेट संवाद ठेवण्यासाठी प्रत्यक्ष भेट-सेवा केंद्र (Help Desk)
माझा दृष्टिकोन (Vision)
“सुजाण, सुरक्षित, स्वच्छ आणि सर्वसमावेशक प्रभाग 10” माझा दृष्टिकोन अत्यंत स्पष्ट आहे प्रभागाचा प्रत्येक नागरिक आपल्या अधिकारांसाठी निडर, संधींसाठी सक्षम आणि जीवनमानासाठी समाधानी असावा.
🔸 जनतेशी निष्ठा मी अपक्ष उमेदवार आहे कारण निर्णय आणि कामांमध्ये फक्त नागरिकांचा फायदा आणि प्रामाणिकता माझी मूलभूत तत्त्वे आहेत.
🔸 विकास हा केवळ कागदावर नव्हे, प्रत्यक्षात दिसणारा हवा प्रत्येक वस्तीमध्ये समतोल विकास, पायाभूत सुविधा आणि सेवा उपलब्ध करून देणे.
🔸 युवक आणि महिलांनी सक्षम असलेला प्रभाग युवकांना रोजगार, महिलांना उद्यमशीलता हे दोन स्तंभ मजबूत केल्याशिवाय प्रभागाचा विकास पूर्ण होऊ शकत नाही.
🔸 स्वच्छ आणि सुशोभित प्रभाग निर्माण करणे आरोग्य, पर्यावरण आणि स्वच्छता हे माझ्या कामाचे तीन मुख्य आधारस्तंभ असतील.
🔸 प्रत्येक घराशी जोडलेली जबाबदारी प्रभागातील प्रत्येक नागरिकाचा प्रश्न हा माझा वैयक्तिक प्रश्न असेल. त्यावर उपाय मिळेपर्यंत मी थेट उपस्थित राहणार आहे





