परिचय

मी सुमित शामराव दातीर, नाशिकचा रहिवासी आणि शशांत एंटरप्रायजेसचा संस्थापक. सामाजिक आणि व्यावसायिक क्षेत्रात काम करताना लोकांशी थेट जोडले जाणे, त्यांच्या समस्या समजून घेणे आणि त्यावर सकारात्मक उपाय शोधणे हेच माझ्या कार्याचे मूलभूत तत्त्व राहिले आहे.

समाजातील प्रत्येक सामान्य नागरिकाचा आवाज प्रशासनापर्यंत स्पष्टपणे पोहोचवण्याची जबाबदारी मी सेवा म्हणून स्वीकारली आहे. मला शिवसेना – माननीय एकनाथजी शिंदे साहेबांच्या नेतृत्वावर पूर्ण विश्वास असून त्यांच्या विकासदृष्टीने प्रेरित होऊन आपल्या प्रभागात ठोस आणि सर्वसमावेशक विकास घडवून आणण्याची माझी मनापासून इच्छा आहे.

नगरसेवक पदासाठी इच्छुक म्हणून माझी विस्तृत व स्पष्ट विकास उद्दिष्टे —

  • पायाभूत सुविधा आणि नागरी सुविधा परिसरातील रस्ते, गटार, स्ट्रीटलाइट, पाणीपुरवठा व्यवस्था यांचे नियोजनबद्ध आणि दर्जेदार सुधारणा  रहिवाशांसाठी 24×7
  • स्वच्छता व कचरा व्यवस्थापन प्रणाली सक्षम करणे सार्वजनिक स्थळांचे सुशोभीकरण, उद्याने, बसथांबे आणि साईनबोर्डचे सुधारित व्यवस्थापन
  • युवक विकास व प्रगती युवकांसाठी कौशल्यविकास केंद्र, करिअर मार्गदर्शन, डिजिटल प्रशिक्षण सुरू करणे स्टार्टअपला प्रोत्साहन, उद्योजकतेसाठी मार्गदर्शन व वित्तीय सल्ला
  • खेळाडूंसाठी क्रीडा साहित्य, मैदान सुधारणा व प्रोत्साहन योजना
  • महिला सुरक्षेसाठी आणि कल्याणासाठी महिलांसाठी विशेष सुरक्षा उपक्रम, हेल्पलाइन आणि नाईट पेट्रोलिंग वाढवणे
  • स्वयंरोजगार प्रोत्साहन, कौशल्य प्रशिक्षण आणि आर्थिक मदत योजना गर्भवती महिला, एकल महिला व वृद्ध महिलांसाठी सहाय्य योजना
  • शिक्षण व विद्यार्थ्यांसाठी उपक्रम  विद्यार्थ्यांसाठी शैक्षणिक मदत, E-learning सुविधा, मोफत मार्गदर्शन वर्ग
  • CCTV सर्व्हिलन्स, सार्वजनिक सुरक्षितता सुधारणा आणि वाहतूक शिस्त
  • सामाजिक व सर्वसमावेशक विकास ज्येष्ठ नागरिकांसाठी आराम केंद्रे, आरोग्य शिबिरे आणि सवलतीचे कार्यक्रम

राजकारण माझ्यासाठी सत्ता नाही; राजकारण म्हणजे लोकांची सेवा, जबाबदारी आणि विश्वास. लोकांच्या अडचणी, गरजा आणि अपेक्षा ऐकून त्यावर त्वरित, पारदर्शक आणि प्रामाणिक काम करणे हेच माझे सर्वोच्च ध्येय आहे.

आपल्या आशीर्वादाने आणि सहकार्याने, आपल्या प्रभागाचा सर्वांगीण, शाश्वत आणि वेगवान विकास साधणे—
हीच माझी प्रामाणिक इच्छा आणि दृढ वचनबद्धता आहे
सुमित शामराव दातीर

Menu